You are currently viewing जातीवादाने होरपळले वैवाहिक नाते

जातीवादाने होरपळले वैवाहिक नाते

जातीवादाने होरपळले वैवाहिक नाते:

सारांश : 

सा. म. रा. वय २७ राहणार वानखेड, बुलढाणा यांना आंतरजातीय विवाहातून आलेल्या अमानवी  अशा जातीवादाचा सामना करावा लागत आहे. केवळ जात आड येते म्हणून त्यांचा विवाह ज्यांच्याशी झाला त्या शु. दे. यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अंत्यत वाईट वागून देऊन मारहाण करत घरातून हाकलवून दिले. सा. म. रा. यांच्या न्यायिक व सन्माननीय जगण्याच्या लढाई सोबतच आपल्या मुलीला “बापाविना” एकट्यानेच वाढवण्याची लढाई लढत आहेत. त्यांच्या या लढाईबाबत. 

सा. म. रा. यांच्याविषयी 

सा. म. रा. वय 27 वर्ष. मु.पो. वानखेड ता.जि.बुलढाणा या गावातील मुळची रहिवासी असून, यांचा जन्म तामगाव या ठिकाणी बौद्ध कुटुंबात झाला. त्यांनी स्वतःचे 6 वी पर्यंतचे शिक्षण तामगाव याच ठिकाणी पूर्ण केले. घरच्या परिसथितीमुळे त्यांना पुढचे शिक्षण पूर्ण करता नाही आले. शिक्षण सोडून त्या शेतात कामाला जाऊ लागल्या.  त्यानंतरचे शिक्षण त्यांनी सोडून दिले व 17 व्या वर्षी त्यांच्या पालकांनी /कुटुंबातील लोकांनी त्यांचा विवाह गौ. रा. स. या व्यक्तीशी करून दिला; परंतु गौ. रा. स. दारू पीत असे आणि सा. म. रा. यांना मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून सा. म. रा. आईकडे, आपल्या माहेरी राहायला आल्या. अशाच परिस्थिती मध्ये त्यांना 2 मुले झाली. सा. म. रा. मुलांना आईकडे सोडून शेतात कामाला जात असे. माहेरी राहत असताना साधनाने पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेऊन बाहेरून 10 वी ची परीक्षा देण्यास अर्ज भरला. याच दरम्यान शु. दे. गावातच राहणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. काही काळाने शु. दे.  यांनी सा. म. रा. बद्दल असलेल्या प्रेम भावना व त्यांचीसा. म. रा. यांच्याशी लग्न करायची इच्छा सा. म. रा. यांना व्यक्त केली. यातूनच पुढे सा. म. रा. यांच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरु झाले. 

सा. म. रा. व शु. दे. यांचे संबंध: 

सुरवातीला सा. म. रा. यांनी शु. दे. यांचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्या पहिल्या पती सोबत म्हणजे गौ. रा. स. यांच्या सोबतही पुन्हा राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शु. दे. यांचा त्रास होऊ लागल्याने हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले व शु. दे. यांना अटकही झाली. कालांतराने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून सा. म. रा. यांनी सासर कायमचे सोडले व त्या माहेरी, आईसोबत राहू लागल्या. शु. दे. यांनी सत्याने त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न केला व शेवटी यशस्वी होत ते सा. म. रा. यांच्याशी विवाहबद्ध झाले. 

शु. दे. यांनी मागे लागून, वेळ प्रसंगी तुरुंगवास सोसत सा. म. रा. यांच्याशी विवाह केला. पण त्यांच्या घरच्यांनी सा. म. रा. यांना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. नाईलाजाने हे जोडपे शेगाव, बुलढाणा येथे राहू लागले. शु दे आणि सा. म. रा. यांचा संसार आनंदाने सुरु झाला व दोघेही प्रेमाने राहू लागले. विवाहाच्या 3 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी प्रि. ठेवले, मुलगी झाल्यानंतर काही दिवसांनी सा. म. रा.ला शु दे. यांची वागणूक बदलली असल्याचे जाणवू लागले. सा. म. रा. यांना न सांगता, सुरवातीला बरेच दिवस व कालांतराने महिना महिनाभर तो घरी परतत नसे. 

सासरचा अनुभव व पोलीस तक्रार: 

सा. म. रा. व लहानगी प्रि. यांना घरीच सोडून त्यांच्या नकळत सा. म. रा. यांचे कपडे, दागिने, आपल्या लहान मुलीचे कपडे असे सर्व घेऊन शु. दे. गायब झाले.  घर खर्चाला आणि घर भांड्याला पैसे नाहीत अशा अवस्थेत यांनी मुलीचा साधारण तीन महिने सांभाळ केला. आणि त्यानंतर त्यांच्या व शु. दे. या दोघांशी मैत्री संबंध असलेल्या व्यक्तीकडूनच शु. दे. यांच्या लग्नाची धक्कादायक अविश्वसनीय माहिती सा. म. रा. यांना मिळाली. त्यांनी खातरजमा करण्यासाठी शु. दे. यांचे घर गाठले. मौजा सोनाडा ता.संग्रामपूर जि.बुलढाणा येथील रहिवाशी असलेल्या शु. दे. यांच्याकडे गेले असता विद्वेषी असलेल्या जातीवादाच भेदक स्वरूप व सा. म. रा. यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. सासू, दिर इत्यादी घरातील लोकांनी मारहाण करून सा. म. रा. व त्यांच्या लहानगीची हकालपट्टी केली. शु. दे. घरी नव्हते व त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीत सा. म. रा. यांनी मुली सोबत सासरच्या घराबाहेर बसून दोन रात्री काढल्या. शेवटी नाईलाजाने तामगाव पोलीस स्टेशन गाठले. तामगाव पोलीस स्टेशन  येथे  शु. दे. यांच्या कुटुंबियांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली कौटूंबिक हिंसाचाचा गुन्हा नोंद केला.

सा. म. रा. यांची न्यायाची लढाई: 

गुन्हा नोंद झाला असला तरी साधना यांच्या राहण्याचा निश्चित ठावठिकाणा नव्हता. शु. दे. यांच्याशी नकार असतानाही विवाह केल्यामुळे सा. म. रा. यांच्या माहेरचे कुटुंबीय त्यांचा व मुलीचा स्वीकार करण्यास इच्छुक नव्हते. तरीही काही दिवस आई सोबतच राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. घरात सुरु असलेल्या इतर कौटुंबिक अडचणी व सा. म. रा. यांचे बाबत असलेली नकारात्मक भावना याचा परिणाम होऊन सा. म. रा. यांनी लहानगीला सोबत घेऊन आईचे घर सोडले. शु. दे. यांच्या प्रतिसादाची, संवादाची उमेद हळू हळू अंधुक होत गेली आणि परिणामी सा. म. रा. यांची मानसिक आणि अवस्था अधिकच खराब होऊ लागली. आपल्या व मुलीच्या जीवनाचा शेवट का करू नये? असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. 

अशा टोकाच्या निराशेत असतानाच त्यांना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भेटले. त्यातूनच पुढे कारवाचे अमरावती विभाग प्रमुख आयु. शीला मोहोड आणि व इतर कार्यकर्ते सा. म. रा. यांच्या संपर्कात आले.  बुलढाणा येथील करावा टीम ने सा. म. रा. मदत करून त्यांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली. शीला ताई व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना मानसिक आधार दिला. कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांची निवासाची व्यवस्था अकोला येथील महिला राजगृहा मध्ये करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातूनच सा. म. रा. यांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात अनुसूचित जाति व अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. यानंतर सा. म. रा. यांचे  दिर यांना अटक झाली. ऍड. आयु. हिवराळे मॅडम यांनी सा. म. रा. यांच्या सासूला व जाऊ यांना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आणि सा. म. रा. यांना कायदेशीर मार्गदर्शन केले. सा. म. रा. महिला राजगृहात राहत असताना त्यांना त्रास होऊ लागला, म्हणून कारवा टीम ने पुणे येथे त्यांच्या निवासाची सोय केली. योग्य पोलीस तपास व्हावा, समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाति व अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व नियम १९९५ या अंतर्गत मिळणारी मदत सा. म. रा. याना देण्यात यावी इत्यादीसह त्यांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी “कारवा” टीम त्यांना सहकार्य करत आहे. सध्या त्यांच्या न्यायाचा लढा सुरु आहे.

– राणी गबने, वर्षा शिवशरण व अमित तिखाडे.

 

*** केस मधील नाव गोपिनीयतेच्या कारणासाठी बदलण्यात आली  आहेत.

Spread the News

Leave a Reply